Pranali Kodre
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जडणघडणीत दादोजी कोंडदेव यांचा मोलाचा वाटा असल्याचे अनेक कागदपत्रांमध्ये वाचणात येते.
दादोजी कोंडदेव हे शहाजी महाराजांच्या विश्वासातील आणि कर्तबगार व्यक्तीमत्व होतं.
त्यांनी पुण्यात असताना शिवाजी महाराजाच्यां जडणघडणीत मदत केली.
दादोजी कोंडदेव हे मावळ प्रदेशाची सुभेदार होते.
त्यांच्या सुभेदारीत आजचे मुळशी, वेल्हे, भोर हे पुण्यातील तालुके, साताऱ्यातील वाई हे मुलूख होते. हा मुलूख मावळ प्रदेश म्हणून प्रसिद्ध होते.
सुभेदार या नात्याने मावळात दादोजी कोंडदेव यांनी शेतकऱ्यांना अभयदान दिले होते. लावणी-संचणीची व्यवस्था त्यांनी केली होती.
याशिवाय दादोजी यांनी चोर-दरोडेखोरांचा बंदोबस्ताची व्यवस्थाही केली होती. त्यांनी बंडखोरी करणाऱ्यांना कडक शासनही केले.
मावळात दादोजी यांनी शांतता आणि सुव्यवस्था निर्माण केली होती. जनतेला संरक्षण दिलं होतं.
दादोजी कोंडदेव यांच्याबरोबरच या प्रदेशात फिरल्याने या परिसराची ओळख शिवरायांना झाली होती.