Pranali Kodre
दहीहंडी साजरी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि रिती आहेत.
मात्र अंगावर आसुडाचे म्हणजे चाबकाचे (सोरट) फटके मारून दहीहंडी साजरी करणारी प्रथा तुम्ही कधी पाहिलीये का?
सुधागड तालुक्यातील जांभूळ पाडा येथे अशी चाबकाचे फटके मारून दहीहंडी साजरी केली जाते. अतिशय वेगळ्या प्रकारे पारंपारिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो.
गोविंदांच्या अंगात कान्होबाचे वारे येते आणि हे सर्वजण घुमायला सुरुवात करतात. महिला त्यांची पूजा अर्चा करतात आणि मग गोविंदा आसुडाचे फटके अंगावर मारून घेत गावभर फिरतात.
ही परंपरा केव्हापासून सुरु झाली हे सांगता येत नाही. मात्र मागील कित्येक वर्षांपासूनची ही परंपरा ग्रामस्थांनी आजही जपली आहे.
प्रत्येक गावात अथवा जिल्ह्यात सण साजरे करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. काही ठिकाणी कृष्णजन्मावेळी रात्री १२ वाजताच दहीहंडी फोडली जाते.
कोकणातील एका गावात विहीरीवर दहीहंडी बांधून ती फोडण्याची प्रथा आहे.
या सर्व प्रथांमध्ये आसुडाचे फटकेमारत दहीहंडी फोडण्याची प्रथा पाहून अनेक जण थक्क झालेत.