आशुतोष मसगौंडे
आज संपूर्ण देशभरात दहीहंडीचा उत्साह असून, लोकांमध्ये आंनंदाचे वातावरण आहे.
राज्यात मुंबई आणि परिसरात कायमच दहीहंडी दणक्यात साजरी केली जाते. यंदाही सर्वत्र हेच चित्र आहे.
आज साजरी केल्या जात असलेल्या दहीहंडीत लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत आणि मुलींपासून महिलांपर्यंत मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत.
प्रताप सरनाईक यांच्या हंडीत न्यू विघ्नहर्ता गोविंद पथकाने महिलांच्या विरोधात होणाऱ्या अत्याचारावर आवाज उठवत विविध फलक झळकावले.
या दहीहंडी कार्यक्रमांमध्ये राजकीय नेतेही मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध दहीहंड्यांना भेटी देत आहेत.
यावेळी काही मंडळांनी पुरुषांबरोबरच महिला आणि दिव्यांगांसाठीही दहीहंडीचे आयोजन केले होते.
विविध मंडळांनी आयोजीत केलेल्या या दहीहंडीत विजेत्या पथकावर लाखो रुपयांच्या बक्षिसांचा वर्षावर होणार आहे.
दहीहंडी दरम्यान जखमी होणाऱ्या गोविंदांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी डोंबिवलीतील एम्स रुग्णालयाने हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.
आमदार राम कदम यांच्या घाटकोपरमधील दहीहंडीत अनेक नृत्यांगणांनी आपल्या कला सादर केल्याचे पाहायला मिळाले.