Pranali Kodre
आपण अनेकदा असे पाहातो की काही लोकं एखादं जरी काम केलं, तरी दमतात. तर काही लोकं अशी असतात, जे बरंच काम करतात, पण दमल्यासारखे वाटत नाही.
जे लोक दमल्यासारखे वाटत नाहीत, त्यांच्या काही साध्या सवयी आहेत, ज्याचा फायदा त्यांना मिळतो. अशा कोणत्या सवयी आहेत, हे जाणून घेऊ.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी झोप. जे लोक रात्री वेळेवर आणि पुरेशी झोप घेतात. त्यांना सकाळी ताजेतवाणे वाटते आणि त्यांच्याकडे दिवसभर काम करण्याची उर्जाही असते.
आहार हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे योग्यवेळी योग्य आहार घेतल्याने शरिरातील ऊर्जा टिकून राहते आणि कामं करण्याची ताकदही मिळते.
कोणतं काम महत्त्वाचं आहे, हे ओळखून त्याचे प्राधान्यक्रम लावल्याने कामं हलकी होतात. त्यामुळे ज्यादाचं काही करावं लागत नाही.
प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरवून घेतली आणि त्यावेळेत कामं पूर्ण केली तर ज्यादाचा वेळ आणि ताकद खर्च होत नाही. त्यामुळे कामाची शिस्त असणारे लोकही दमल्यासारखे वाटत नाहीत.
जे लोक प्रत्येकवेळी कृतज्ञता व्यक्त करतात आणि ज्यांच्या संगतीत सकारात्मक विचार करणारे आणि चांगल्या गोष्टीला प्राधान्य देणारे लोक असतात, त्यांचा मुडही चांगला राहतो. परिणामी हे लोक दमल्यासारखे वाटत नाहीत.
ज्या लोकांना व्यायामाची किंवा योग करण्याची सवय असते, असे लोकही दमल्यासारखे वाटत नाही.
शरिरात योग्य पाण्याचं प्रमाण असणंही महत्त्वाचं असतं. त्यामुळे जे लोक वेळोवेळी शरिराला हायड्रेट ठेवतात, त्यांच्या उर्जाही राहणे आणि त्यांना दमल्यासारखं वाटत नाही.
जे लोक कामादरम्यान योग्य आणि पुरेशी विश्रांती घेतात. ते लोकही काम अधिक कौशल्यपूर्ण करू शकतात. कारण विश्रांतीमुळे त्यांचे शरीर फार दमत नाही.