सकाळ डिजिटल टीम
रोज किमान मूठभर सुकामेवा खावा. त्याचे वजन साधारणत: ३० ग्रॅम असावे.
रोज ड्रायफ्रुट्स खाणे चांगल्या आरोग्याचे रहस्य आहे. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फायबरचे गुणधर्म असतात.
मूठभर ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. यात फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो.
कोरड्या फळांमध्ये भरपूर जीवनसत्व असते. शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी ही ड्रायफ्रुट्स उपयोगी पडतात.
ड्रायफ्रुटसमध्ये ओमेगा ३ हे फॅटी अॅसिड असते. त्यामुळे स्मरणशक्ती वाढते. मेंदूसाठी फायदेशीर असल्याने हे लहान मुलांना देऊ शकता.
यामुळे रक्ताभिसरण सुधारते, यामध्ये असणारे अॅंटीऑक्सिडंटमुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते
गरोदरपणात महिलांना अॅनिमीयाची समस्या असते. त्यामुळे थकवा किंवा अशक्तपणा असा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे अशा महिलांनी सुका मेवा खावा.
सुकामेवा कोलस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी मदत करते. यामध्ये असणारे व्हिटॅमिन बी आणि लोह असते त्यामुळे पोषणास मदत मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.