Rashi Bhavishya: 'या' पाच राशींना मिळणार आज मोठा धनलाभ

सकाळ डिजिटल टीम

मेष राशीचे लोकांना आज भरपूर यश मिळणार मात्र व्यापार्‍यांना आज नफा मिळविण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. आज तुम्हाला भविष्यातील खर्चाची चिंता वाटू शकते. आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन कोणतेही काम करा.

आजचा दिवस खूप व्यस्त असणार आहे. नोकरीत पगारवाढची शक्यता आहे. आज खुप खर्च होणार त्यामुळे खरेदीवर आवर घाला. गाईला हिरवा चारा घालावा, हे तुमच्यासाठी शुभ असेल.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आज कामाच्या ठिकाणी यश मिळणार ज्यामुळे तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. कलेशी संबंधित व्यक्तींना उत्तम संधी मिळणार. नवीन लोकांशी भेट होणार. देवी लक्ष्मीची पूजा करणे, तुमच्यासाठी शुभ आहे.

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस परिश्रम घेणारा आहे. तुमच्या रागावर कंट्रोल ठेवा. नोकरीच्या तुम्हाला संघर्ष करावा लागू शकतो. मनासारख्या गोष्टी न घडल्याने तुम्हाला अस्वस्थता जाणवेल. हनुमान चालिसा वाचणे, तुमच्यासाठी शुभ आहे.

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार. व्यवसायाच्या दृष्टीनेही दिवस चांगला आहे. कोणावरही विश्वास ठेवू नका, तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ राहील. आज तुमचा मूड खूप चांगला असणार. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार. संध्याकाळी तुम्ही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. गणेशाला लाडू अर्पण करा, तुमच्यासाठी शुभ असणार.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील.व्यवसायात यश मिळेल. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. शिव चालिसाचे पठण करा, हे तुमच्यासाठी शुभ असणार.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कौटुंबिक तणावाचा असेल. आज कुटुंबात काही वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांतता राखा. पांढऱ्या वस्तू दान करा.

धनु राशीच्या लोकांचे कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. आज पाहूणे येण्याची शक्यता आहे. गणपतीला मोदक अर्पण करा.

मकर राशीचे लोकांना संधी मिळू शकते. आज कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. आज कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वीकोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला घ्या. शिव चालिसा पठण करा.

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. आज तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. सामाजिक क्षेत्रातील लोकांना भरपूर प्रशंसा मिळणार. देवी सरस्वतीची पूजा करा.

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. आज गुंतवणुकीत संकोच करू नका. पांढऱ्या वस्तू दान करणे, शुभ असणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.