Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाजांचे कौटुंबिक जीवन कसे होते याबद्दल तपशीलवार माहिती मिळत नाही. मात्र महाराजांची दिनचर्या कशी होती याचे वर्णन चिटणीस बखरींत आहे. ते पुढे लिहले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पहाटे लवकर उठत असत.
उठताच गायक स्तुती गात असत आणि मंगल वाद्यांचा नाद होत असे. यामध्ये वीणा, मृदंग इत्यादी मंगल वाद्ये असत.
प्रातःस्मरण केल्यानंतर शिवाजी महाराज प्रातर्विधी उरकत असत
नंतर गोमातेचे दर्शन घेत आणि मंगलालंकार करून स्नान करत असत.
जपध्यान आणि देवतांचे पूजन केल्यावर ब्राह्मणांच्या धर्मचर्चेत सहभागी होत.
पुराणश्रवणानंतर महाराज तिरंदाजी आणि निशाणबाजीचे सराव करत असत.
सभेत महाराज आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करत आणि त्यांची कामे विचारून पूर्ण करत.
भेटीला आलेल्या प्रत्येकाला महाराज भेटत असत आणि त्यांचे मुजरे स्विकारत
महाराजांशी संवाद करणाऱ्यांना ते सन्मानाने उत्तर देत आणि काही वेळा हास्य करीत.
दुपारच्या भोजनानंतर महाराज चर्चा करत असत.
भोजनानंतर महाराज काही वेळ वामकुक्षी घेत.
त्यानंतर महाराज कारखाने, महाल याची पाहणी करीत असत.
न्यायालयातील प्रकरणांचे बारकाईने अवलोकन करीत असत.
सायंकाळी महाराज बाहेरील स्वारी, बागा, देवालये यांची पाहणी करत असत.
रात्रीच्या भोजनानंतर महाराज सभेत सहभागी होऊन पत्रे आणि अहवाल तपासत.