Anuradha Vipat
आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटात छोट्या बबिता फोगाटची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागरचं निधन झालं आहे.
अभिनेत्री सुहानी भटनागरनं वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे
वृत्तानुसार, अभिनेत्रीचा काही दिवसांपूर्वी पाय फ्रॅक्चर झाला होता.
उपचारादरम्यान चालू असलेल्या औषधांचा तिच्या शरीरावर दुष्परिणाम झाला. त्यामुळे तिच्या शरीरात अतिरिक्त द्रव जमा होऊन तिचं निधन झालं आहे
गेल्या काही दिवसांपासून सुहानीवर फरीदाबाद येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते.
शनिवारी फरीदाबाद येथे तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.