वॉर्नरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा! कशी होती दैदिप्यमान कारकीर्द?

Pranali Kodre

ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात

अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करताच ऑस्ट्रेलियाचे टी20 वर्ल्डकप 2024 मधील आव्हान संपुष्टात आले.

Australia Cricket Team | Sakal

डेव्हिड वॉर्नरची निवृत्ती

त्यामुळे ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप 2024 मधून बाहेर पडताच धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

David Warner | Sakal

पदार्पण

साल 2009 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केलेल्या वॉर्नरने अनेक अफलातून खेळी करत ऑस्ट्रेलियाला मोठे विजय मिळवून दिले.

David Warner | Sakal

मोठे विजय

वॉर्नरने त्याच्या कारकि‍र्दीत वनडे वर्ल्ड कप, टी20 वर्ल्ड कप, कसोटी चॅम्पियन्सशीप असे अनेक मोठी विजेतीपदं जिंकली.

David Warner | Sakal

बंदी अन् पुनरागमन

मात्र, त्याला 2017 मध्ये चेंडू छेडछाड प्रकरणात एक वर्षाच्या बंदीच्या कारवाईचाही सामना करावा लागला. पण एका वर्षाच्या बंदीनंतर त्याने 2018 मध्ये क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केले.

David Warner | Sakal

कसोटी कारकिर्द

वॉर्नरने 112 कसोटी सामने खेळताना 44.59 च्या सरासरीने 26 शतके आणि 37 अर्धशतकांसह 8786 धावा केल्या आहेत.

David Warner | Sakal

वनडे कारकिर्द

वनडेत वॉर्नरने 161 सामने खेळले असून 45.30 च्या सरासरीने 22 शतके आणि 33 अर्धशतकांसह 6932 धावा केल्या.

David Warner | Sakal

आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द

वॉर्नरने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 110 सामन्यांत 33.43 च्या सरासरीने 1 शतक आणि 28 अर्धशतकांसह 3277 धावा केल्या.

David Warner | Sakal

हिटमॅन @200! रोहित T20I मध्ये 'हा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच क्रिकेटर

Rohit Sharma | X/BCCI
येथे क्लिक करा