कार्तिक पुजारी
अनेकजण रात्री उशिरापर्यंत जागतात. तसेच रात्रीची झोप पूर्ण करण्यासाठी दिवसा झोपतात.
पण, दिवसा झोपणे तुमच्यासाठी हानीकारक ठरु शकते.
हैद्राबादमधील न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी याची माहिती दिली आहे.
दिवसाची झोप ही तुमच्या शरीराच्या घड्याळाची संलग्न झालेली नसते.
त्यामुळे दिवसा झोप घेतल्याने स्मृतिभ्रंश आणि मानसिक विकाराच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
रात्री जागरण करुन काम करणाऱ्या लोकांमध्ये ताण, लठ्ठपणा, आकलनक्षमतेत कमी अशा समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो.
त्यामुळे रात्री जागरण करुन सकाळी झोपणाऱ्यांनी या गोष्टीची नक्की काळजी घ्यावी