गरोदरपणात चमकदार त्वचेसाठी दीपिका लावते 'हा' आयुर्वेदिक फेसपॅक

Monika Lonkar –Kumbhar

दीपिका पादूकोण

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री 'मस्तानी गर्ल' दीपिका पादूकोण.

स्किनकेअर

दीपिकाने नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिच्या स्किनकेअर रूटीनबद्दल सांगितले आहे. ती चेहऱ्याला मंजिष्ठीचा फेसपॅक लावते. याचा फोटो तिने शेअर केलाय.

मंजिष्ठी

मंजिष्ठी ही एक आयुर्वेदिक वनस्पती असून, याचा वापर प्रामुख्याने औषधांमध्ये आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो.

त्वचेसाठी लाभदायी मंजिष्ठी

चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स अन् इतर समस्या दूर करण्यासाठी मंजिष्ठी लाभदायी आहे. या मंजिष्ठीचा फेसपॅक कसा बनवायचा? चला जाणून घेऊयात.

गुलाबजल

एका बाऊलमध्ये मंजिष्ठीची २ चमचे पावडर घ्या. या पावडरमध्ये गुलाबजल मिसळून त्याची पेस्ट तयार करा.

फेसपॅक

ही पेस्ट आता चेहऱ्याला लावा. १५-२० मिनिटांनंतर चेहरा धुवा. तुम्हाला याच प्रभाव लगेच दिसून येईल.

मसूरडाळीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने काय होते?

Masoor Dal Face Pack | esakal
येथे क्लिक करा.