सकाळ डिजिटल टीम
तिखट पदार्थ
डेंग्यूच्या रूग्णांनी तिखट पदार्थांचं मुळीच सेवन करू नये. यामुळे पोटात अॅसिड जमा होते आणि अल्सरची समस्या वाढू शकते.
कॉफी
कॉफीऐवजी आहारात आरोग्यवर्धक पेयांचा समावेश करावा. कॅफिनयुक्त पेयांमुळे हृदयाचे ठोके वाढतात, शारीरिक थकवा जाणवतो आणि स्नायूंशी संबंधित समस्या वाढते.
मांसाहार करू नये
नॉनव्हेज पदार्थांमध्ये मसाल्यांचा वापर अधिक प्रमाणात असतो. परिणामी या पदार्थांचे पचन सहजरित्या होत नाही.
नॉनव्हेज पदार्थांचे सेवन केल्यास रूग्णांच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. यामुळे जास्तीत जास्त पाणी प्यावे आणि आहारात हेल्दी फुडचा समावेश करावा.
डेंग्यूची लागण झाल्यास कोणकोणत्या गोष्टींचा डाएटमध्ये समावेश करावा, हे देखील जाणून घेऊया
नारळाचे पाणी
डेंग्यूच्या आजारात नारळाचे पाणी पिणे फायदेशीर मानले जाते. यामध्ये इलेक्ट्रोलाइट्ससह अन्य पोषणतत्त्वांचाही मोठ्या प्रमाणात साठा असतो.
पपईची पाने
पपईच्या पानांमध्ये पपेन आणि किमोपापेन यासारखे एंझाइम्स असतात. यामुळे अन्नपदार्थांचे पचन योग्यरित्या होते.
कीवी
कीवी फळामध्ये पोटॅशिअमसह व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई यासारख्या पोषणतत्त्वांचा साठा मोठ्या प्रमाणात असतो.
यामुळे हायपरटेंशन आणि उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. कीवी फळाचे सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती देखील मजबूत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.