Anuradha Vipat
आमिर पुन्हा एकदा चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे
आमिर बहुचर्चित ‘सितारे जमीन पर’ चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सितारे जमीन पर’चं दिग्दर्शन आरएस प्रसन्ना यांनी केलं आहे. आता या चित्रपटात झळकणाऱ्या नायिकेचं नावंही समोर आलं आहे.
रिपोर्टनुसार, अभिनेत्री जिनिलीया देशमुखने आमिर खानचा आगामी चित्रपट ‘सितारे जमीन पर’ साइन केला आहे.
याशिवाय जिनिलीयाने यासंदर्भात माहिती देणारी एक इन्स्टाग्राम स्टोरी देखील शेअर केली आहे.
या स्टोरीला जिनिलीयाने “१६ वर्षांनंतर…” असं कॅप्शन दिलं आहे. यापूर्वी जिनिलीयाने आमिरच्या ‘जाने तू या जाने ना’ चित्रपटात काम केलं होतं.