आशुतोष मसगौंडे
देवेंद्र फडणवीस हे 2014 मध्ये राज्यात भाजपचे पहिले मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर त्यांनी राज्याच्या राजकारणात चांगलाच जम बसवला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी 1992 मध्ये नागपूर महापालिकेची निवडणूक लढवली आणि 22व्या वर्षी ते पहिल्यांदा नगरसेवक झाले.
वयाच्या 27व्या वर्षी फडणवीस 1997 मध्ये नागपूरचे महापौर झाले.
महापौर म्हणून उत्तम काम केल्यानंतर 1999 मध्ये फडणवीस यांना विधानसभेची संधी मिळाली. त्यांनी नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 9000 मतांनी विजय मिळवला.
देवेंद्र फडणवीस यांना 2004 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 2,32,911 मते मिळाली होती. तर त्यांच्या विजयाचे लीड 17610 इतके होते.
फडणवीस जशा जशा निवडणुका लढवत गेले तसे तसे त्यांचे लीड वाढत गेले. त्यांनी 2009 मध्ये 27 हजार मतांनी विजय मिळवला होता.
2014 मध्ये फडणवीसांनी विधानसभा निवडणुकीत 59 हजार मतांनी विजय मिळवला होता आणि याच निवडणुकीनंतर त्यांच्या गण्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली होती.
2019 मध्ये मुख्यमंत्रीपदी असताना देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या अशिष देशमुख यांचा पराभव करत 49 हजार मतांनी विजय मिळवला होता.