Pranali Kodre
आगामी टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी मंगळवारी (30 एप्रिल) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.
1 जून ते 29 जून 2024 दरम्यान अमेरिकेत आणि वेस्ट इंडिजमध्ये ही स्पर्धा खेळली जाणार आहे.
या स्पर्धेसाठी भारतीय संघात युजवेंद्र चहलची देखील निवड झाली आहे.
त्यामुळे चहल आता ऑगस्ट २०२३ नंतर जून २०२४मध्ये भारताच्या टी२० संघात खेळताना दिसू शकतो.
दरम्यान, चहलच्या निवडीबद्दल त्याची पत्नी धनश्री वर्मानेही आनंद व्यक्त केला आहे.
तिने इंस्टाग्राम स्टोरीला संघाच्या घोषणेची पोस्ट शेअर करताना कॅप्शन लिहिले की 'कम ऑन. युजवेंद्र चहल. तो परत आलाय.'
दरम्यान, चहल भारताचा अनुभवी गोलंदाजही आहे, तसेच भारताकडून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.
चहलने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ८० सामन्यांत ९६ विकेट्स घेतल्या आहेत.