'या' सुपरहिट सिनेमाच्या शुटिंगवेळी झोपडीत राहिले धर्मेंद्र

सकाळ डिजिटल टीम

धर्मेंद्र

अभिनेते धर्मेंद्र यांनी आजवर अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांचा शोले हा सिनेमा खूप गाजला.

वीरू

या सिनेमात त्यांनी साकारलेली वीरूची भूमिका अनेकांना आवडली. मस्तमौला पण हुशार वीरू सगळ्यांना भावला.

झोपडीत काढली रात्र

या सिनेमासाठी धर्मेंद्र यांनी खूप मेहनत घेतली. जेव्हा जेव्हा सिनेमाचं शूटिंग लेट संपायचं तेव्हा धर्मेंद्र हॉटेलवर न जाता सेटवरीलच झोपडीमध्ये रात्र काढायचे.

२ ८ मैल चालले

तर धर्मेंद्र यांना चालण्याचा खूप शौक होता. एकदा शूटिंगदरम्यान ते असेच फिरता फिरता २ ८ मैल दूर चालत गेले.

सेटवर शोधाशोध

सेटवर सगळेजण धर्मेंद्र यांची वाट बघत जेवण्यासाठी थांबले होते. त्यावेळी मोबाईलची सोय नसल्याने त्यांना शोधताही येत नव्हतं. त्यामुळे सगळं क्रू त्यांना शोधू लागला.

बंगळुरूमधील किस्सा

तर एकदा बंगळुरूमध्ये धर्मेंद्र आणि अमिताभ फिरायला गेले असताना त्यांना बघून लोकांची गर्दी जमली.

रिक्षाने गाठलं रामगढ

तेव्हा धर्मेंद्र आणि अमिताभ रिक्षात बसून तिथून पळाले आणि त्याच रिक्षातून ते रामगढला पोहोचले.

रिंकूचे आवडीचे पदार्थ - येथे क्लिक करा