सकाळ डिजिटल टीम
वाई तालुक्यातील धोम धरणाचा (Dhom Dam) डावा कालवा पांडे गावच्या हद्दीत मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी ओझर्डे गावच्या चंद्रभागा ओढ्यात शिरले.
ओढ्याला पुराचे स्वरूप आले असून यामध्ये झोपेत असलेल्या ऊसतोड मजुरांचा संसार वाहून गेला आहे.
दोन बैलांची शोध मोहीम सुरू असून 12 बैल वाचवण्यात यश आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, भुईंज पोलीस (Bhuinj Police) ठाण्याचे एपीआय रमेश गर्जे हे पहाटे चार वाजता पोहचले.
ऊसतोड मजुरांना मदत प्रशासनाकडून सुरू होती. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
वाई तालुक्यातील धोम धरणाच्या कालव्याला पांडे गावच्या हद्दीत मध्यरात्री तीन वाजता भगदाड पडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.