ध्रुव जुरेल पदार्पणाचा कसोटी सामना वडिलांना का करतोय समर्तिप?

अनिरुद्ध संकपाळ

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा राजकोट येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात विकेटकिपर म्हणून ध्रुव जुरेल हा कसोटी पदार्पण करण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशाच्या 23 वर्षाच्या ध्रुव जुरेलला राजकोट कसोटीत संधी मिळू शकते याचे संकेत त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या एक्स हँडलवर प्रसिद्ध करून दिले.

या व्हिडिओत ध्रुव जुरेलने जर त्याला इंडियाची कॅप मिळाली तर तो ती कॅप आपल्या वडिलांना समर्पित करणार असल्याचं सांगतो.

ध्रुव जुरेल आपल्या वडिलांबाबत बोलताना म्हणाला की, ज्यावेळी मला थोडा संभ्रम असतो त्यावेळी मी त्यांच्याशी बोलतो. ते मला मार्गदर्शन करतात अन् ते माझे हिरो आहेत.

जुरेलने टीम इंडियाच्या बसमध्ये बसण्याचा पहिला अनुभव देखील शेअर केला. त्यावेळी तो म्हणाला की ज्यावेळी माझी निवड झाली त्यावेळी मला खूप भीती वाटली होती.

मला बसमध्ये कुठं बसायला मिळणार ही एकच चिंता होती. मला कोणीतरी येऊन ही माझी सीट आहे असं म्हणालं तर मी काय करू याची काळजी होती.

रणजी ट्रॉफीत सर्वात चांगली बॉलिंग फिगर कोणाची आहे?

येथे क्लिक करा