Anuradha Vipat
आजच्या दिवशी रंग लावून आनंद साजरा करणे ही आता सध्या प्रचलित पद्धत झाली आहे
रविवारी होळी सण साजरा झाल्यानंतर लगेचच धुळवड असल्याने सर्वांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे.
सकाळपासूनच लहान मुलांनी तसेच तरुणांनी धुळवड खेळण्यासाठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे
विविध प्रकारचे रंग, पिचकाऱ्या तसेच फुगे फोडून पाण्याचा वापर करून मुले धुळवड खेळताना दिसत होती.
सोसाट्यांमध्ये डीजे लावून तसेच मोठमोठ्या हॉटेल्स मधील लॉन्स, कॉलेजजवळ तसेच मैदानी भाग व रस्त्यांवर तरुणाची गर्दी दिसत होती.
धुलिवंदन हा होळीची राख व माती अंगाला लावण्याचा दिवस असून हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करतात.