Anuradha Vipat
अभिनेत्री दिया मिर्झा कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते
दिया फक्त सिनेमांमुळे नाही तर तिच्या स्पष्ट वक्तव्यामुळे देखील चर्चेत असते.
आता नुकत्याचं दिलेल्या मुलाखतीमध्ये दियाने पूर्वी इंडस्ट्रीमध्ये महिलांना कशी वागणूक मिळायची यावर मोठं वक्तव्य केलं आहे.
दिया मिर्झा म्हणाली, करियरच्या सुरुवातील मला मीडिया आणि इंडस्ट्रीमध्ये एवढंच सांगितलं जातं होतं की तू एक महिला आहेस.
पुढे दिया मिर्झा म्हणाली, मला असं सांगितलं जात होतं की, तुझं करियर ठराविक काळापर्यंत असेल. जर तुझं वय 20 आहे तर तुला सेलिब्रिटींसोबत कास्ट केलं जाणार नाही.
पुढे दिया मिर्झा म्हणाली, अभिनेत्यांना देखील एका ठराविक वयाची अभिनेत्री हवी असते.
तसेच पुढे तुमच्या आयुष्यात कोणता पुरुष नसला पाहिजे, तुम्ही सिंगल असायला हवे असा खुलासा दिया मिर्झाने केला आहे