Monika Lonkar –Kumbhar
आजकाल मधुमेह हा सामान्य आजार झाला आहे.
मधुमेह होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे सध्याची बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव होय.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मधुमेहींनी त्यांच्या आहारात कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) असलेल्या फळांचा आहारात समावेश करणे फायदेशीर आहे.
ही फळे खाल्ल्याने मधुमेहाच्या रूग्णांना मोठा फायदा होऊ शकतो. या फळांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येईल. कोणती आहेत ही फळे? चला तर मग जाणून घेऊयात.
व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमीन बी-१, बी-३, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमने समृद्ध असलेले खरबूज आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायेदशीर आहे.
या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा ५४ असून तो अतिशय कमी आहे. त्यामुळे, मधुमेहींनी त्यांच्या आहारात या फळाचा जरूर समावेश करावा. या फळाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
प्रथिने आणि कॅल्शिअमने युक्त असलेली केळी आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायेदशीर आहेत. केळीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा ५१ असून, जो अतिशय कमी आहे. केळीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित केली जाते.
लालबुंद असलेली चेरी व्हिटॅमीन सी, पोटॅशिअम, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. त्यामुळे, चेरी ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या चेरीचा ग्लायसेमिक इंडेक्स केवळ २० आहे, जो अत्यंत कमी आहे.