मधुमेही रुग्णांनी साखरे ऐवजी 'हे' आहारात खावे...

Aishwarya Musale

मधुमेह

आजकाल जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मधुमेहाचा आजार झपाट्याने पसरत आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी थोडं तरी गोड खाल्ल तर त्यांच्या रक्तातील साखर लक्षणीय वाढते.

मिठाई

पण मधुमेहींना मिठाई टाळणे अवघड असते. मात्र, जर त्यांना गोड खावेसे वाटत असेल तर ते पुढील गोष्टींचे सेवन करू शकतात.

डार्क चॉकलेट

जर तुम्हाला मधुमेह असेल आणि तुम्हाला मिठाईची आवड असेल तर डार्क चॉकलेट हा एक चांगला पर्याय असू शकतो. हे खूप आरोग्यदायी आहेत.

बनाना आइस्क्रीम

मधुमेही रुग्णांना गोड खावेसे वाटत असेल तर केळीचे आईस्क्रीम खाऊ शकतात. केळीमध्ये प्रामुख्याने फायबर आढळते. हे साखरेचे शोषण कमी करण्याचे काम करते.

सफरचंद

रोज एक सफरचंद खाल्ल्याने तुम्हाला डॉक्टरकडे जावे लागणार नाही, असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल किंवा वाचले असेल. सफरचंद ही पोषक तत्वांची खाण असल्याने असे म्हटले जाते.

द्राक्ष

मधुमेही रुग्णांना मिठाई खावीशी वाटल्यास द्राक्षे खाऊ शकतात. हे एक आरोग्यदायी आणि फायबर युक्त फळ आहे. लाल द्राक्षे आश्चर्यकारकपणे प्रभावी आहेत.

नाशपाती

मधुमेही रुग्णांना गोड खावेसे वाटत असेल तर ते नाशपाती खाऊ शकतात. हा फायबरचा उत्तम स्रोत आहे.

नाशपाती रक्तातील साखरेचे शोषण कमी करण्याचे काम करते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढू देत नाही.

जेवणात हिंग वापरणं का महत्त्वाचं आहे? जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा