Pranali Kodre
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भालाफेकीत भारताच्या नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकले. हे त्याचे दुसरे ऑलिम्पिक पदक आहे.
दरम्यान, या स्पर्धेवेळी नीरजने मनगटात घातलेलं घड्याळही चर्चेत राहिलं.
रेडीटवरील एका युझरने दावा केला आहे की नीरजने घातलेलं घड्याळ OMEGA Seamaster AquaTerra 150M हे असून त्याची किंमत ५० लाखाहून अधिक आहे.
OMEGA Seamaster AquaTerra 150M मध्ये 41-मिमी टायटॅनियम केस आहे, संरक्षित टेलिस्कोपिक क्राऊन आहे, जे स्क्रॅच-प्रतिरोधक सफायर क्रिस्टल्सद्वारे संरक्षित आहे.राखाडी डायलमध्ये AquaTerra स्ट्राईप्स आणि एक Seamaster लोगो आहे.
तसेच या घड्याळ्यात १५ बार वॉटर रेझिस्टन्स असून ७२ तास पॉवर रिझर्व्ह देखील आहे.
दरम्यान या घड्याळातील टायटेनियम व्हर्जनची तीन घड्याळे उपलब्ध असून एकाची किंमत सुमारे 12 लाख असून इतर दोन घड्याळांची किंमत 50-52 लाख रुपये आहे. त्यामुळे सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यांमध्ये तथ्य असू शकते.
लक्षात घेण्यासारखी नीरज ओमेगा कंपनीचा ब्रँड अँबेसिडर आहे. त्यामुळे त्याने या कंपनीचे घड्याळ घालणे काही आश्चर्याची गोष्ट नाही.