Saisimran Ghashi
आपण कार्यक्रमाच्यावेळी अनेकदा ऐकतो की आमंत्रण आले आहे किंवा निमंत्रण आले आहे.
पण कधी विचार केला आहे काय आमंत्रण आणि निमंत्रण यामध्ये काय फरक असतो.
कोणी आलं किंवा नाही आलं तरी कार्यक्रम पार पडणार असेलच तर अशा वेळी आमंत्रण दिलं जातं.
ठराविक व्यक्ती किंवा व्यक्तींशिवाय नियोजित कार्यक्रम पार पडू शकणार नसेल तर अशा कार्यक्रमांचं निमंत्रण दिलं जातं.
समारंभ, विवाह यासाठी आमंत्रण वापरले जाते, तर छोट्या भेटीसाठी निमंत्रण वापरले जाते.
आमंत्रण आणि निमंत्रण, दोन्हींचा योग्य वापर प्रसंगानुसार करण्याची गरज असते.
इंग्रजीमध्ये आमंत्रण आणि निमंत्रण दोन्हीला इनविटेशन असेच म्हणतात.