Saisimran Ghashi
खूप लोक आकर्षण आणि प्रेमाला एकसारखे समजतात आणि पूर्ण आयुष्य चिंतेत आणि भांडणात व्यतीत करतात तर जाणून घेऊया आकर्षण आणि प्रेमात काय फरक आहे..
आकर्षण कुणालाही एका नजरेत होऊ शकतं ज्याला लोक पहिल्या नजरेतल प्रेम असं म्हणतात खरंतर ते पहिल्या नजरेत प्रेम होऊ शकत नाही मात्र आकर्षण होऊ शकतं.
खरं प्रेम व्हायला वेळ लागतो कुणाशीही प्रेम व्हायला वेळ लागतो प्रेमाच्या भावना हळूहळू विकसित होतात परंतु आकर्षण लगेच होते आणि त्यामध्ये भावनेपेक्षा जास्त मनाचा खेळ असतो.
जास्त करून लोकांना म्हणताना ऐकले असेल तुझे केस सुंदर आहेत,नाक छान आहे, तुझे डोळे किती निरागस आहेत त्यामुळे तुझ्यावर प्रेम झालं.
परंतु ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे कुणाचेही डोळे नाक अन्य शारीरिक गोष्टी तुम्हाला आकर्षित करतात पण ते प्रेम नसते. प्रेम नेहमी व्यक्तीशी त्याच्या व्यवहाराशी किंवा त्याच्या वागणुकीशी होत असते.
प्रेम हे सर्व काळासाठी असते आणि आकर्षण काही दिवसातच हातपाय मारू लागते. जर कुणाला भेटण्यासाठी आतुर आहे, वेडेपणा करत आहात, झुरत आहात तर ते फक्त आकर्षण आहे. प्रेमात लोक भेटू इच्छितात पण त्यांच्यामध्ये वेडेपण नसते.
प्रेमात असलेले दोन लोक भविष्याच्या गोष्टी करतात एकमेकांना सोबत घेऊन पुढचे आयुष्य चांगले बनवण्याची तयारी करतात.आकर्षणात असलेले जोडपे नेहमीच वेडेपण करतात पण स्वतःच्या नात्याचा विचार करत नाहीत.
प्रेमात असलेली व्यक्ती आपल्या प्रेमासाठी प्रायोरिटी निश्चित करतो त्याला किंवा तिला सर्वात पुढे ठेवतो तर दुसरीकडे आकर्षण मध्ये असलेली व्यक्ती सर्व कामानंतर आपल्या पार्टनरसाठी थोडा वेळ काढतो.
आकर्षणात असलेली व्यक्ती नेहमी शारीरिक गोष्टींवर जास्त लक्ष देते आणि प्रेमात असलेली व्यक्ती चरित्र, व्यवहार, भोळेपणा,दयाळूपणा या गोष्टींवर लक्ष देते कारण आकर्षण क्षणिक आहे पण प्रेम व्यक्तीच्या मनात सदैवसाठी जिवंत राहते.
जर तुम्ही प्रेमात आहात तर नक्कीच आकर्षण आणि प्रेमातला अंतर समजून घ्या.