आशुतोष मसगौंडे
चंद्र महिन्यावर आधारित हिंदू कॅलेंडरमध्ये प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असतात, एक शुक्ल पक्षात आणि दुसरी कृष्ण पक्षात.
शास्त्रानुसार अमावस्येनंतर येणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात.
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव करत त्याचा कालावधी दहा दिवस निश्चित केला. त्यानुसार महाराष्ट्रात दहा दिवस अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन केले जाते.
हिंदू धर्मात दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी लोक मोठ्या उत्साहाने गणपतीची मूर्ती घरी आणतात आणि तिची प्रतिष्ठापना करतात.
गणपतीचा हा उत्सव 10 दिवस चालतो, त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते.
चतुर्थी ही महिन्यातून दोनदा येत असते तर चतुर्दशी ही वर्षातून एकदात येते, ज्या दिवशी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येते.
हिंदू धर्मग्रंथानुसार प्रत्येक महिन्यातील विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीला विघ्न दूर करणाऱ्या श्रीगणेशाची उपासना आणि उपवास केल्याने माणसाची सर्व संकटं दूर होतात.
विनायक चतुर्थी उपवास हा रिद्धी-सिद्धी (संपत्ती, ज्ञान, मालकी इ.) मिळवण्याची ईच्छा असणाऱ्यांकडून पाळला जातो, तर संकष्टी चतुर्थी जीवनातील अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने पाळली जाते.
दरम्यान देशात प्रामुख्याने महाराष्ट्रात दरवर्षी दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो.