कॅपचिनो, लाटे, एस्प्रेसो... पाहा वेगवेगळ्या कॉफीमधील फरक!

Sudesh

कॉफी

जगभरात कॉफीचे कित्येक चाहते आहेत. अनेकांसाठी तर कॉफी ही गरज बनली आहे. काही लोकांचा तर कॉफी पिल्याशिवाय दिवसच सुरू होत नाही.

Types of Coffee | eSakal

चहाला टक्कर

भारतामध्येही सध्या कॉफीच्या चाहत्यांची वाढलेली संख्या पाहता, चहाला कॉफी चांगलीच टक्कर देताना दिसत आहे.

Types of Coffee | eSakal

कॉफीचे प्रकार

स्टारबक्स, सीसीडी आणि इतर प्रसिद्ध कॉफी जॉइंट्समध्ये कॉफीचे विविध प्रकार मिळतात. कॅपचिनो, लाटे, एस्प्रेसो अशा विविध प्रकारच्या कॉफी उपलब्ध आहेत.

Types of Coffee | eSakal

फरक

कॉफीच्या या प्रकारांमध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्यूजन होतं. तुम्हालाही यातील फरक कळत नसेल, तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत.

Types of Coffee | eSakal

एस्प्रेसो

Espresso ही कॉफी बनवण्यासाठी कॉफीच्या बियांच्या पावडरमधून मोठ्या प्रेशरने उष्ण वाफ पुढे ढकलली जाते. ही डार्क कॉफी असते, यामध्ये दूध टाकत नाहीत.

Types of Coffee | eSakal

माच्चिआतो

एस्प्रेसो कॉफीमध्येच थोड्या प्रमाणात फोम्ड दूध टाकलं, की तयार होणाऱ्या कॉफीला Macchiato म्हटलं जातं. ही गरम किंवा थंड अशा दोन्ही प्रकारे सर्व्ह करता येते.

Types of Coffee | eSakal

मोचा

एस्प्रेसो, दूध आणि त्यावर चॉकलेट असं कॉम्बिनेशन म्हणजे मोचा कॉफी. ज्यांना आपल्या कॉफीमध्ये चॉकलेट आवडतं, अशांची ही फेव्हरेट आहे.

Types of Coffee | eSakal

कॅपचिनो

सर्वात खाली एस्प्रेसो, त्यानंतर तेवढ्याच प्रमाणात दूध आणि त्यावर दुधाचा फेस अशी मांडणी असलेली कॉफी म्हणजे कॅपचिनो. कित्येकांना ही कॉफी आवडते.

Types of Coffee | eSakal

लाटे

लाटे आणि कॅपचिनोमध्ये जास्त फरक नसतो. Latte कॉफीमध्ये कॅपचिनोच्या तुलनेत कमी प्रमाणात दुधाचा फेस असतो. तसंच, ही जास्त स्मूद आणि लाईट असते.

Types of Coffee | eSakal

अमेरिकानो

एस्प्रेसोमध्येच दुधाऐवजी आणखी गरम पाणी टाकल्यास अमेरिकानो ही कॉफी तयार होते. यालाच ब्लॅक कॉफी म्हणूनही ओळखलं जातं. यामध्ये साधारणपणे साखर टाकत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Types of Coffee | eSakal