Mangalsutra Designs: पहा एकापेक्षा एक भारी महाराष्ट्रीयन मंगळसूत्र

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळे मंगळसूत्राचे प्रकार पहायला मिळतात.

मुहूर्तमणी मंगळसूत्र हे दिसायला नाजूक आणि सध्या खूप ट्रेंडवर आहे.

कोल्हापूरी मंगळसूत्र हे कोल्हापूरी साजमधील एक विशेष प्रकार आहे. या मंगळसूत्राची देशभरातून मागणी आहे.

वाटी मंगळसुत्र हे खूप कॉमन आहे पण या मंगळसूत्राला शास्त्रात विशेष महत्त्व आहे.

अशातच पेशवाई मंगळसूत्रही खूप भारदस्त आणि सुंदर प्रकार आहे. हे मंगळसूत्र विशेषत: नऊवारी किंवा पेशवाई साड्यांवर उठून दिसतं.

डोरले मंगळसुत्र हे पुरातन काळापासून स्त्रिया परिधान करतात. हे मंगळसूत्र काठापदराच्या साड्यांवर शोभून दिसतं.

सरस्वती पेंडंट मंगळसूत्र हे सध्या खूप जास्त ट्रेंडवर आहे. जर तुम्ही प्लेन साडी नेसत असाल तर यावर हे मंगळसूत्र उठून दिसेल.

चंद्रकोर मंगळसुत्र हे खणाच्या साडीवर उठून दिसतं.

आगरी कोळी मंगळसुत्र हे लग्न समारंभात विशेषत: घातले जातात. या मंगळसूत्राला सहा पदरी मंगळसूत्रही म्हणतात.

चेन मंगळसूत्र सध्या खूप ट्रेडींगवर आहे. या मंगळसूत्रात काळे मणी खूप कमी असतात. हे तुम्ही कोणत्याही ड्रेसवर परिधान करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.