आशुतोष मसगौंडे
2019 च्या विधानसभा निवडणुकीत चांदिवली मतदारसंघातून दिलीप मामा लांडे विजयी झाले होते. त्यांनी गेली चार टर्म आमदार असलेल्या आरिफ खान यांचा पराभव केला होता.
ही निवडणूक दिलीप लांडे अवघ्या 409 मतांनी जिंकले होते. विशेष म्हणजे लांडे गेल्या विधानसभेत सर्वात कमी मतांनी विजयी होणार उमेदवार होते.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांना 85816 तर काँग्रेसचे उमेदवार आरिफ खान यांना 85436 मते मिळाली होती.
2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आरिफ खान यांनी चांदिवली विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराचा 29469 मतांनी पराभव केला होता.
2009 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आरिफ खान यांनी मनसेच्या उमेदवाराचा 82616 मतांनी पराभव केला होता. विशेष म्हणजे यावेळी लांडे मनसेचे उमेदवार होते.
2019 च्या निवडणुकीत शिवसेनेकडून निवडून आल्यानंतर लांडे यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडातही सहभाग नोंदवला होता.
यंदा दिलीप लांडे यांची टक्कर कोणाशी होणार हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे या मतदरसंघातून महाविकास आघाडीकडून कोणाला संधी मिळते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे.