Pranali Kodre
भारताच्या वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्व सध्या रोहित शर्माकडे आहे, तर टी२० संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्याकडे आहे.
पण, त्यांच्यानंतर भविष्यात भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार, याबाबत बऱ्याचदा चर्चा झाली आहे.
भारतीय संघाचे भविष्यात कर्णधार होण्यासाठी अनेक युवा खेळाडू प्रबळ दावेदार आहेत.
आता भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने भविष्यात भारतीय संघाचे नियमित कर्णधार होऊ शकणाऱ्या दोन खेळाडूंची नावं सांगितली आहेत.
कार्तिकने क्रिकबझशी बोलताना सांगितले की यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि फलंदाज शुभमन गिल भारतीय संघाचे भविष्यात कर्णधार होऊ शकतात.
कार्तिकने यामागील कारण सांगितले की पंत आणि शुभमन हे दोघेही आयपीएलमध्येही कर्णधार आहेत.
तसेच कार्तिकने असेही सांगितले की पंत आणि शुभमन दोघांनीही प्रभारी कर्णधारपद यापूर्वी सांभाळले आहे.
पंत सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा, तर शुभमन गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे.