Anuradha Vipat
बदलापूरमधील शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी मराठी सिनेसृष्टीतील कलाकार आवाज उठवून निषेध करत आहेत.
या प्रकरणी अभिनेत्री जुई गडकरीने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.
यामध्ये जुईने लिहिलं आहे की, ”कोलकाता, बिहार, दिल्ली, बदलापूर वगैरे…यांना डायरेक्ट पब्लिक धुलाईला द्या.
पुढे जुईने लिहिलं आहे की, कसले पुरावे हवे आहेत अजून, कसली वाट बघतोय आपण, किळस येते अक्षरशः, संताप होतो
पुढे जुईने लिहिलं आहे की, गल्लिच्छ राक्षस…बदलापूरमध्ये जे झालं तसं व्हायला हवंय, कॅन्डल्स जाळून काही होत नाही
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आता आरोपीला अटक झाली आहे.