Saisimran Ghashi
शाकाहारी आहार आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते.
शाकाहाराने हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोगाचा धोका कमी असतो.
पण शाकाहारी आहार घेताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.
शाकाहारी आहारात मांसाहाराच्या तुलनेने काही महत्त्वाच्या पोषक तत्वांची कमतरता असू शकते.
प्रथिने, आयरन, झिंक आणि व्हिटॅमिन बी12 ही काही उदाहरणे आहेत.
या पोषक तत्वांची कमतरता झाल्यास शरीराला आवश्यक असलेले कार्य प्रभावित होऊ शकतात.
उदाहरणार्थ, प्रथिनांच्या कमतरतेमुळे स्नायूंची कमजोरी आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते.
व्हिटॅमिन बी12 ची कमतरता झाल्यास नर्व्ह सिस्टमवर परिणाम होऊ शकतो.
शाकाहारी आहार घेणाऱ्यांनी आपल्या आहारात विविधता आणून दूध,पनीर सारख्या पदार्थांचा समावेश करून प्रोटिनची कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करावा.
नट्स,डाळी, कडधान्ये, सोयाबीन आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये ही पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. अश्या डाळी आणि भाजीपाला खावा ज्यातून व्हिटॅमिन आणि पोषक तत्वांची कमतरता भरून निघेल.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्यासाठी योग्य आहार योजना तयार करा.