Anuradha Vipat
टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी
पण आता दिव्यांका तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत दिव्यांकाने बेबी प्लानिंगवर मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र दिव्यांकाची चर्चा रंगली आहे.
दिव्यांका म्हणाली, ‘विवेक आणि मी आता बाळाला जन्म देण्यासाठी तयार आहोत.लग्नाला 8 वर्ष झाली आहेत, आता बाळाचा विचार करा… असं कुटुंबाकडून सतत सांगण्यात येत आहे.
पुढे दिव्यांका म्हणाली, आई होणं फार मोठी जबाबदारी आाहे. आता मला असं वाटतं माझ्या आयुष्यातील फार मोठा टप्पा निघून गेला आहे.
‘मला लोक कायम विचारतात सरोगेसी का नाही करत? हा पूर्णपणे माझा आणि विवेकचा निर्णय आहे असंही देखील दिव्यांका म्हणाली