पुजा बोनकिले
दिव्यांचा सण दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
यंदा दिवाली १ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे.
दिवाळीत माता लक्ष्मीची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात.
दिवाळी नवीन कपडे, फटाके, स्वादिष्ट फराळ खाण्याची मज्जाच वेगळी असते.
दिवाळीत अनारसे बनवण्याची परंपरा आहे. अनेकांना अनारसे खायला आवडतात.
अनारसे बनवण्यासाठी तांदूळ, गूळ तेल किंवा तूप, काजू ,बदाम, खसखस, पाणी साहित्य लागते.
जाळीदार आणि खुसखुशीत अनारसे तयार करण्यासाठी सर्वात आधी अर्धा किलो रेशनचा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे. नंतर पूर्ण तांदूळ बुडेल एवढे पाणी घालून झाकून ठेवावे.
प्रत्येक दिवशी तीन दिवसापर्यंत तांदळामधील पाणी काढून दुसरे पाणी घालावे. तिसऱ्या दिवशी भिजत घातलेले तांदूळ स्वच्छ चार ते पाच वेळा पाण्याने धुऊन घ्यावे. एका गाळणीवरती निथळून काढावे. तांदूळ चांगला फरमेंट झाल्यावरच अनारसे जाळीदार बनवतात.
पाणी पूर्ण निथळून झाल्यावर स्वच्छ कापडावर तांदूळ एक तास वाळवून घ्यावं. उन्हात किंवा फॅनखाली वाळवू नका. कोरडे झालेले तांदूळ मिक्सरमध्ये चांगले बारिक करून घ्यावे. अगदी मैद्या सारखे पीठ तयार करावे.
बारिक केलेले पीठ वाटीने मोजल्यावर अडीच वाटी पीठ भरतं अर्धा किलो तांदूळाचे अडीच वाटी पिठाला सव्वा एक वाटी बारिक केलेला गूळ घाला आणि किलोभरमध्ये सोडेतिनशे ते चारशे ग्रॅम गूळ वापरावा. गूळ चांगला मिक्स करून घ्यावा. नंतर मिक्सरमध्ये हे मिश्रण एकजीव करून घ्यावे.
नंतर पीठ हाताने चांगले मळून घ्यावे. आता मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून हवाबंद डब्ब्यात पीठ भरून ठेवावे. डब्यामध्ये पीठ दोन दिवस मुरवू घ्यावे. गुळामुळे पीठाला पाणी सुटतं आणि पीठ सैल बनवून तयार होते.
एका भांड्यात पीठ काढून जायफळ आणि सुंठ विलायची पावडर टाकून चांगले एकजीव करावे. नंतर शेवटी काजू, बदाम, खसखस वर अनारसा थापून घ्यावा. नंतर मंद आचेवर गरम केलेल्या तेलात अनारसा सोनेरी होईपर्यंत तळून घ्यावे.