पुजा बोनकिले
भटकंतीचे ठिकाण निश्चित झल्यावर किती दिवसांचा प्लॅन आहे, त्यानुसार सामान सोबत घ्यावे.
पॅकिंग करताना शक्यतो एक, दोन ते तीन, पाच सहा दिवसांच्या ट्रिपसाठी काय काय सामान लागते, याची यादी तयार करावी.
कपडे शक्यतो पॅकिंग करताना हलके, सुती किंवा होजिअरीचे टी-शर्ट असावेत.
ऋतू आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करून बॅक पॅक करावी.
बॅगमध्ये कपडे भरताना घडीऐवजी रोल केल्यास त्याने कमी जागा व्यापली जाते.
कुठलीही बॅग पॅक करताना ती तिच्या क्षमतेच्या साधारण ९० टक्के भरावी.
सर्व बॅगवर आपल्या नावाचे लेबल लावावे आणि कुठल्या बॅगमध्ये काय ठेवले आहे, याची एक यादी बनवावी. ज्यामुळे शोधाशोध होणार नाही.
वरील टिप्स फॉलो केल्यास भटकंती फक्त सामानवाहू ट्रिप न बनता आनंददायी सुखाचे क्षण गाठीशी बांधणारा आयुष्याचा ठेवा बनून जाते.