पुजा बोनकिले
दिवाळी हा सण ५ दिवस साजरा केला जातो.
यंदा दिवाळी ३१ आॉक्टोबरला साजरी केली जाणार आहे.
आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. यंदा वसू बारस २८ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे.
आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. यंदा २९ ऑक्टोबरला हा सण साजरा केला जाणार आहे.
नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवले. यंदा ३० ऑक्टोबरला हा सण साजरा केला जाणार आहे.
आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. यंदा लक्ष्मीपूजन अनेक ठिकाणी ३१ ऑक्टाबरला तर काही ठिकाणी १ नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे.
बलिप्रतिपदा कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात, या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात.
कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले असे मानले जाते.यंदा भाऊबीज ३ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे.