Amit Ujagare (अमित उजागरे)
दिवाळी आता सुरुच होत आहे, यानिमित्त तुम्ही घरच्याघऱी छान कपल फोटोशूट करु शकता.
दिवाळीनिमित्त घर सजवताना तुम्ही फोटोशूट करु शकता.
घराबाहेर किंवा घरात दिव्यांची आणि फुलांची आरास करताना छान फोटोशूट करता येईल.
दिव्यांची आरास करताना अशी छान पोझही तुम्हाला चांगल्या फोटोशूटचा फील देईल.
तुमच्या घरात लहान बाळ असेल तर त्याच्यासह असं छान फोटोशूट करा
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री फटाके उडवताना हातात फुलबाजा घेऊन तुम्हाला असं छान कपल फोटोशूट करता येईल.
फुलबाजासह असंही छान फोटोशूट करता येईल.
रांगोळी आणि दिवे लावताना हातात पणती घेऊन असं मस्त फोटोशूट करता येईल.
रंगीबिरंगी एलईडी लाईटच्या चायनिज माळा या खूपच आकर्षक दिसतात, त्या हातात घेतल्यास सुरक्षित असतात, त्यामुळं फोटोशूटही करता येईल.
पणत्या लावताना आपल्या पार्टनरकडं पाहतानाची छान पोझ तुम्हाला प्रसन्नतेचा अनुभव देईल.
एलईडीच्या माळांसह असंही फोटोशूट करता येईल.
चायनिज बनावटीच्या एलईडी लाईटच्या माळा अंगावर घेऊन असंही आकर्षक फोटोशूट करता येईल.
फुलबाजासह असं रोमॅँटिक फोटोशूट तुम्हाला सोशल मीडिया स्टेट्सवर वाहवा मिळवून देईल.
गिफ्ट्स, दिवे आणि नव्या कपड्यांमध्ये तुम्ही पार्टनरसोबत सेल्फी घेताना फोटोशूट करु शकता, हे दिसायला खूपच छान दिसतं.