सकाळ डिजिटल टीम
Diwali Vacation : दिवाळी हा जगातील सर्वात प्रसिद्ध सणांपैकी एक आहे आणि तो संपूर्ण भारतात साजरा केला जातो. दिवाळी हा भारतात 'दिव्यांचा सण' म्हणून ओळखला जातो.
दिवाळीच्या निमित्ताने अनेकदा लोक कुटुंबासोबत फिरण्याचा प्लानिंग करतात. कारण, दिवाळीत अनेक सुट्ट्या असतात.
दिवाळी अवघ्या काहीच दिवसांवर आली आहे. सुट्टी घेऊन फिरायला कुठं जायचं प्लॅन करताय? परदेशात जाण्याची योजना आखताय? मग, पाहा परदेशात नेमकी कोणत्या ठिकाणी दिवाळीचा अतुलनीय आनंद तुम्ही घेऊ शकता.
दुबई हे एक असं ठिकाण आहे, ज्याचं सौंदर्य प्रत्येकाला जवळून पहावंसं वाटतं. जर तुम्ही पहिल्यांदाच दुबईला जात असाल तर हे ठिकाण तुम्हाला लंडन-पॅरिसपेक्षा कमी नाही. दुबई आपल्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांसाठी पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. भारतातून या सुंदर शहरात तुम्ही फक्त 3 तास 35 मिनिटांत पोहोचू शकता.
जर तुमचं बजेट खूपच कमी असेल, पण तुम्हाला परदेशी टूरही करायची असेल तर तुम्हाला सिंगापूर खूप आवडेल. सिंगापूर जगभरातील बॅकपॅकर्स, फोटोग्राफर, एडवेंचर लवर्स आणि शॉपिंग उत्साही लोकांना आकर्षित करते. हे शहर कुटुंबासह भेट देण्यासाठी योग्य आहे. तुम्ही बेंगळुरूहून सिंगापूरला ४ तास ३० मिनिटांत सहज पोहोचू शकता.
भारतातून तुम्ही अवघ्या चार तासांत मलेशियाला पोहोचू शकता. एक उत्तम शॉपिंग डेस्टिनेशन असण्यासोबतच, मलेशिया आपल्या स्वादिष्ट स्ट्रीट फूडसाठी देखील प्रसिद्ध आहे. तुम्ही कुटुंबासोबत आलात किंवा काही कामासाठी, मलेशिया तुम्हाला कंटाळा येऊ देणार नाही. चेन्नईहून फ्लाइटने क्वालालंपूर ४ तासांच्या अंतरावर आहे.
बजेट फ्रेंडली यादीमध्ये थायलंडचं नाव येतं. आकर्षक नाइटलाइफ, समुद्रकिनारे आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ हे असे संयोजन आहे जे तुम्हाला येथे कंटाळा येऊ देणार नाही. भारतातील मोठ्या शहरांमधून तुम्ही येथे स्वस्तात फ्लाइट तिकीट खरेदी करू शकता. येथील फ्लोटिंग मार्केट देखील एकदा पहा.