Diwali Weekend Destinations : निसर्गाच्या सानिध्यात दिवाळी साजरी करायची आहे? भारतातील 'या' सुंदर ठिकाणांना जरुर भेट द्या

सकाळ डिजिटल टीम

दिवाळी लाँग वीकेंड

दिवाळी सणाला आजपासून सुरुवात झाली आहे. तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात सुद्धा दिवाळीचा सण उत्साहात साजरा करू शकता. चला जाणून घेऊया या ठिकाणांबद्दल..

Diwali Weekend Destinations

चौकोडी, उत्तराखंड

उत्तराखंडमध्ये दिवाळी साजरी करायची असेल, तर तुम्ही चौकोडीला जाऊ शकता. हे ठिकाण पिथौरागढ जिल्ह्यात आहे. दिवाळीच्या काळात या हिल स्टेशनचं हवामान चांगलं असतं. तुम्ही इथे दिवाळीचा सण शांततेत साजरा करू शकता.

Diwali Weekend Destinations

कुमारकोम, केरळ

कुमारकोम केरळमधील (Kumarakom Kerala) एक लहान आणि सुंदर शहर आहे. कुट्टनाड प्रदेशात वसलेलं हे शहर कोट्टायमपासून १४ किलोमीटर अंतरावर आहे. येथे तुम्ही तुमची दिवाळीची सुट्टी शांततेत साजरी करू शकता.

Diwali Weekend Destinations

जिभी, हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशमधील जिभी हे दिवाळीच्या सुट्टीसाठी योग्य ठिकाण आहे. इथे आल्यावर तुम्हाला एका वेगळ्याच जगात आल्याचा भास होईल. तुम्ही इथे गावात होणाऱ्या दिवाळी उत्सवातही सहभागी होऊ शकता.

Diwali Weekend Destinations

माशोब्रा, हिमाचल प्रदेश

माशोब्रा (Mashobra Shimla) हे हिमाचल प्रदेशातील शिमला येथे स्थित एक लहान शहर आहे. माशोब्रामध्ये इतकी शांतता आणि हिरवळ आहे की, दिवाळीच्या फटाक्यांचा ध्वनी आणि प्रदूषण तुम्हाला इथं अजिबात पाहायला मिळणार नाही.

Diwali Weekend Destinations

वागमोन, केरळ

वागमोन हे केरळमधील (Vagamon Kerala) एक गाव आहे, जे हिल स्टेशनने वेढलेले आहे. येथील हिरवळ, सुंदर दृश्ये आणि शांत वातावरण तुमच्या मनाला भुरळ घालेल. चहाच्या बागांनी वेढलेले हे गाव दिवाळीच्या सुट्टीसाठी योग्य ठिकाण आहे.

Diwali Weekend Destinations

पुष्कर

जर तुम्हाला दिवाळीचा सण मोठ्या थाटात साजरा करायचा असेल तर, तुम्ही पुष्करला भेट दिलीच पाहिजे. पुष्करला होळी साजरी करण्यासाठी बरेच लोक जातात; पण इथली दिवाळीही खूप प्रसिद्ध आहे.

Diwali Weekend Destinations

Diwali Vacation : दिवाळी सुटीत परदेशात फिरायला जायचा बेत आहे? 'ही' आहेत बजेट डेस्टिनेशन्स

येथे क्लिक करा...