भावा-बहिणीचं नातं अधोरेखित करणारी बॉलिवूडमधील रक्षाबंधन स्पेशल गाणी

सकाळ डिजिटल टीम

उद्या 14 ऑगस्टला देशभरात रक्षाबंधनचा सण थाटात साजरा केलं. भावा-बहिणीच्या प्रेमळ नात्याचं महत्त्व सांगणाऱ्या या सणाची गाणी लोकप्रिय आहेत. जाणून घेऊया या गाण्यांविषयी.

चार बहिणी आणि त्यांच्या एकुलत्या एक भावाची गोष्ट सांगणारा रक्षाबंधन या सिनेमातील धागोंसे बांधा हे गाणं भावा-बहिणीचं गोड नातं सुंदरपणे खुलवतं. अरिजित सिंहने हे गाणं गायलं आहे.

छोटी बहन या सिनेमातील भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना हे गाणं आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. बलराज साहनी आणि नंदा यांच्यावर चित्रित झालेलं गाणं एव्हरग्रीन ठरलंय.

'बहनाने भाई के कलाई पे' हे गाणं अजूनही तितकंच लोकप्रिय आहे. रेशम की डोरी या सिनेमातील हे गाणं धर्मेंद्र आणि कुमुद यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे.

ट्रेजेडी क्वीन मीनाकुमारी यांच्या गाजलेल्या काजल सिनेमातील मेरा भैय्या मेरा चंदा हे सुद्धा भावा- बहिणीचं अनोखं नात सांगणार गाणं आहे. मीनाकुमारी आणि शैलेशकुमार यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे.

अनपढ या सिनेमातील गाजलेलं रंगबिरंगी राखी लेके आई बहना हे गाणं खूप गाजलं होतं. बलराज साहनी आणि माला सिन्हा यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं.

येथे क्लिक करा