सकाळ डिजिटल टीम
सफरचंद खाल्ल्याने शरीराला अनेक आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात, ज्यामुळे शरीर सुरळीत चालण्यास मदत होते.
रोज रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्याही दूर होतात; पण काही गोष्टी अशा आहेत, ज्यामुळं तुमच्या शरीराचं नुकसान देखील होऊ शकतं.
सफरचंदात अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. इतकंच नाही तर यामध्ये आयर्न, पोटॅशियम, फायबर, मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक देखील असतात.
सफरचंद खाल्ल्यानंतर कधीही दही खाऊ नये, अन्यथा खोकल्याची समस्या उद्भवू शकते आणि तुमच्या फुफ्फुसात संसर्गासारख्या समस्यांचा धोका निर्माण होऊ शकतो.
सफरचंद खाल्ल्यानंतर चुकूनही पाणी पिऊ नका. कारण, त्यामुळे पोटात ॲसिडची समस्या निर्माण होऊ शकते.
सफरचंद खाल्ल्यानंतर चुकूनही मुळा खाऊ नका. कारण, त्यामुळे सर्दी होण्याची शक्यता असते. शिवाय, खोकल्याचा देखील त्रास जाणवतो.
सफरचंद खाल्ल्यानंतर लोणचे खाल्ल्यास पोटाचा त्रास होऊ शकतो. खरं तर, सफरचंद खाल्ल्यानंतर लगेच लोणचे खाल्ल्याने पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.