वॅक्सिंग केल्यानंतर या 5 गोष्टी करू नका..

Aishwarya Musale

त्वचेचं सौंदर्य टिकवण्यासाठी नियमित क्लीन्जिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग करणं आवश्यक असतं. या स्कीन केअर रूटीनबरोबरच त्वचेवरचे अनावश्यक केस काढून टाकणंही गरजेचं असतं.

शरीरावरचे नको असलेले केस काढण्यासाठी महिला वॅक्सिंग करतात. वॅक्सिंग केल्याने त्वचेवरचे नको असलेले केस निघतात आणि त्वचाही स्वच्छ दिसते; 

हे करताना खूप वेदना होतात पण त्यानंतर त्वचा पूर्णपणे मऊ होते. बरेच लोक असे असतात की वॅक्सिंग केल्यानंतर त्यांची त्वचा काळी पडू लागते. आज आम्ही तुम्हाला वॅक्सिंगनंतर कोणती कामे करू नयेत ते सांगणार आहोत.

गरम पाण्याने आंघोळ करू नये

काही लोकांसोबत असेही दिसून आले आहे की वॅक्सिंग केल्यावर त्वचा जास्त काळवंडते. असे होऊ नये असे वाटत असेल तर वॅक्सिंग केल्यानंतर खूप गरम पाण्याने आंघोळ करू नये, थंड पाण्याचा वापर करावा.

सूर्यप्रकाशाचा संपर्क

वॅक्सिंग केल्यानंतर आपली त्वचा खूप नाजूक होते, त्यामुळे तिची खूप चांगली काळजी घेतली पाहिजे. आपण जास्त सूर्यप्रकाशाचा संपर्क टाळला पाहिजे. कारण त्यामुळे तुमची त्वचा काळी पडू शकते. टॅनिंगसह तुम्हाला रॅशेस देखील येऊ शकतात.

बॉडी स्क्रब करू नये

अनेक लोक वॅक्सिंगनंतर बॉडी स्क्रब करून घेतात, परंतु तुम्ही असे करू नये. ते तुमची त्वचा खराब करते. वॅक्सिंग केल्यानंतर ३-४ दिवस तुम्ही काहीच करू नये. जर तुम्ही स्क्रबऐवजी बेबी शॉप वापरत असाल तर ते तुमच्यासाठी जास्त फायदेशीर आहे.

केमिकल वस्तू लावू नये

असे बरेच लोक आहेत जे वॅक्सिंग करून घेतात पण त्यांची त्वचा खूप खराब दिसू लागते. तुम्ही तुमच्या त्वचेवर अशी कोणतीही केमिकल वस्तू लावू नये, ज्यामुळे तुमची त्वचा खूप खराब होते.

जेव्हा तुम्ही वॅक्सिंग कराल तेव्हा तुम्ही त्या भागाला अजिबात खाजवू नये. असे केल्याने खाज आणि लालसरपणाची समस्या वाढते. आपण आपल्या पायांना आणि हातांना जास्त स्पर्श करू नये.

'चक्रफूल' जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर!

येथे क्लिक करा