Aishwarya Musale
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, पण मायक्रोवेव्हमध्ये काही खाद्यपदार्थ पुन्हा गरम केल्याने त्यांची चव आणि पौष्टिक मूल्य खराब होऊ शकते.
मायक्रोवेव्हमध्ये आपण कोणते पदार्थ गरम करू शकतो आणि कोणते पदार्थ गरम करणे योग्य नाही, हे आपल्याला माहित असले पाहिजे. आज आशचा काही पदार्थांबद्दल जाणून घेऊया.
तळलेले पदार्थ किंवा फ्रेंच फ्राईज मायक्रोवेव्हमध्ये पुन्हा गरम करण्याची चूक करत असाल तर आजपासून असे बिलकूल असे करू नका.
कारण फ्रेंच फ्राईज मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यास त्यांची कुरकुरीतपणा कमी होऊ शकतो आणि त्यांची चव देखील बदलू शकते.
बहुतेक लोकांना मांस गरम असताना खायला आवडतं, जरी ते शिळे झाले असले तरीही बरेच लोक मायक्रोवेव्हमध्ये ते गरम करून खाण्याची चूक करतात. पण असे करू नये.
कारण ओव्हनमध्ये मांस गरम केल्याने त्याची चव खराब होऊ शकते. ते मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्याऐवजी तुम्ही ग्रिलवर किंवा पॅनमध्ये तळू शकता.
अंड्याचे पदार्थ कधीच मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नयेत. अंड्याची एखादी डिश बनवली तर ती लगेचच खावी किंवा परत गरम केली तर थोडं गार करून खावी.
पालक, साग, मेथी यांसारख्या भाज्यांमध्ये नायट्रेट असते. ओव्हनमध्ये हिरव्या भाज्या गरम केल्यावर त्यात असलेले नायट्रेट हानिकारक बनते, ज्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.