सकाळ डिजिटल टीम
लघवीचे वेगवेगळे रंग एखाद्या व्यक्तीला कोणत्या आजाराने ग्रस्त आहे, हे सांगू शकतात. यामुळेच लोक लघवी थांबवण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याच्याशी संबंधित चुका करतात.
लघवी झाल्यावर लगेच पाणी पिण्याची सवय असेल, तर आधी जाणून घ्या ही सवय योग्य की अयोग्य?
लघवी केल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास त्याचे अनेक तोटे होतात. लघवीनंतर लगेचच पाणी प्यायल्याने तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
लघवी केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. कारण, यामुळे काही गंभीर समस्या उद्भवू शकतात. अधून-मधून लघवी केल्यानंतर पाणी पिणे हानिकारक नाही. परंतु, जर तुम्ही असे रोज केले तर त्यामुळे किडनीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
यामागील कारण म्हणजे, लघवी केल्यानंतर लघवीची पिशवी रिकामी होते आणि नंतर त्यात काही घटक राहतात जे लघवीच्या मार्गातून बाहेर जाऊ शकत नाहीत, अशा स्थितीत जेव्हा तुम्ही पाणी पितात तेव्हा ते घटक त्यात विरघळत नाहीत.
लघवीनंतर लगेच पाणी पिण्याची सवय शरीरासाठी हानिकारक आहे. असे केल्याने युरिन इन्फेक्शन (यूटीआय) होऊ शकते.
डॉक्टरांच्या मते, एखाद्याने लघवी केल्यानंतर लगेच नाही तर किमान 15 मिनिटांनी पाणी प्यावे, ज्यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका कमी होतो.
लघवी झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये. कारण, त्यामुळे किडनीशी संबंधित समस्या देखील होऊ शकतात. या समस्यांपैकी किडनी स्टोन सामान्य आहे.
लघवी झाल्यावर लगेच नाही, तर 15 ते 20 मिनिटांनी पाणी प्यावे आणि तेही फक्त 1 ग्लास पाणी प्या, जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले नाही.