तुम्हीही झोपेत बडबडता काय? असू शकतो हा गंभीर आजार

साक्षी राऊत

एखादा व्यक्ती झोपेत बडबड करत असेल तर त्याला पॅरोसोमनिया नावाचा स्लीप डिसॉर्डर असू शकतो. झोपेत बडबडण्याची अनेक कारणं असू शकतात. जसे की, स्ट्रेस, डिप्रेशन, झोपचा अभाव, थकवा, व्यसन.

Sleep Disorder

लक्षणे

या आजाराचे पहिले लक्षण म्हणजे रात्री झोपेत बडबडणाऱ्या लोकांना दिवसा फार झोप येते. काही लक्षणांमध्ये झोपेच्या सवयींत बदल आणि झोपेत फार हलणे अशाही समस्या असू शकतात.

Sleep Disorder

या आजाराचा सगळ्यात जास्त धोका कोणाला?

हा आजार कुठल्याही वयातील व्यक्तीस होऊ शकतो. हा डिसॉर्डर दारूचे व्यसन असणाऱ्या व्यक्तीस, स्ट्रेस असणाऱ्या किंवा मेंटल डिसॉर्डर असणाऱ्या व्यक्तीसही होऊ शकतो.

Sleep Disorder

या गोष्टींकडे ठेवा विशेष लक्ष

झोपेत बडबडण्याच्या आजारावर कुठलेही खास औषध नाही. मात्र या आजारावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कुठल्याही व्यक्तीने रात्री भरपूर झोप आणि जेवण करून या आजारावर नियंत्रण ठेवता येतं.

Sleep Disorder

कॅफिनचे कमी सेवन करा

तुम्हाला झोपेत बडबडण्याची सवय असेल तर तुम्ही चहा आणि कॉफीचे सेवन कमीत कमी करायला हवे. रात्री कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने झोपेच्या समस्या उद्भवतात.

Sleep Disorder

स्ट्रेस

अनेकदा स्ट्रेसमुळेसुद्धा व्यक्ती झोपेत बडबडतो. तुम्हाला फार जास्त स्ट्रेस असेल तर तुम्ही मेडिटेशन सुरु करावे. स्ट्रेसमुळे मेंदूवर ताण पडतो. ज्यामुळे तुम्हाला झोप कमी येते.

Sleep Disorder

तेव्हा झोपेतील बडबडणे हलक्यात घेऊ नका. लक्षणे दिसल्यास वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sleep Disorder