Amit Ujagare (अमित उजागरे)
1) IDIOT म्हणजे Internet Derived Information Obstructing Treatment.
2) म्हणजेच इंटरनेट हा माहितीचा प्रचंड मोठा स्त्रोत असल्यानं लोक आपल्या आजारावरील औषधं इंटरनेटवर सर्च करुन घेतात.
3) खरंतर एखाद्या आजाराची लक्षण जाणवत असल्यानं डॉक्टरकडून तपासणी करुन घेऊन त्यांनी लिहून दिलेली औषधंच घेणं गरजेचं आहे. पण हा इडियट सिन्ड्रोम झालेल्या व्यक्तीचा केवळ इंटरनेटवरच विश्वास असतो.
4) WHOनं या परिस्थितीला 'इन्फोडेमिक' म्हटलं आहे, यामुळं आरोग्य सेवेत एक जटिल परिस्थिती निर्माण झाली आहे.
5) PubMed या जर्नलमध्ये प्रकाशित अहवालानुसार, IDIOT सिंड्रोममुळं डिजिटल वातावरणाच्या परिणामामुळं डॉक्टरांवर अविश्वास निर्माण झाला आहे.
6) खरंतर हा सिन्ड्रोम झालेली व्यक्ती आपल्यावर सुरु असलेले उपचार अचानक थांबवते आणि केवळ इंटरनेटवरील माहितीवरुनच उपचार घेत राहते.
7) एखाद्या आजाराविषयी अतिशय आणि अवास्तव भीती बाळगणे ही या आजाराची लक्षणं आहेत.
8) ऑनलाइन वाचलेल्या माहितीवरही प्रश्न उपस्थित करा आणि तणावग्रस्त होण्यापूर्वी वैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घ्या, असा सल्ला यातून बाहेर पडण्यासाठी WHOनं दिला आहे.