सकाळ डिजिटल टीम
मोबाईल आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. आपण सर्वच रात्री मोबाईल वापरतो आणि झोपताना मोबाईल तसाच उशाशी ठेवून झोपतो. पण त्याचे आपल्या आरोग्यावर कोणते परिणाम होतात. तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग जाणून घेऊयात.
मोबाईलमधून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स मुळे डोकेदुखी, चक्कर येणे, डोळे दुखणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
मोबाईलमधून येणऱ्या रेडिएशन्स थेट तुमच्या डोक्यापर्यंत जातात. त्यामुळे ब्रेन ट्यूमरसारखे आजार होऊ शकतात.
जर तुम्ही तुमच्या जवळ मोबाईल फोन घेऊन झोपत असाल तर त्याच्या उष्णतेमुळे तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
मोबाईवर सारख्या येणाऱ्या नोटीफिकेशन्समुळे झोपमोड होऊ शकते, अपुऱ्या झोपेमुळे तुमच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
फोन स्क्रीनमधून निळा प्रकाश येतो. ज्यामुळे झोपेसाठी लागणाऱ्या मेलाटोनिन हार्मोनचे उत्पादन कमी होते आणि यामुळे झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
रात्री झोपताना उशाखाली फोन ठेवल्यामुळे तुमच्या शरीरातील स्ट्रेस हॉर्मोन्स वाढतात. ज्यामुळे तुम्हाला मानसिक आजार होऊ शकतात.
मोबाईल जवळ ठेवल्याने झोप न आल्यास आपण सारखा मोबाईल उघडूवन पाहतो. त्यामुळे आपल्या मेंदूला आराम मिळत नाही आणि मग आपली चिडचिड होते व कामातील एकाग्रता कमी होते.
अभिनेती अक्षरा सिंगच्या अडचणींमध्ये वाढ