Chinmay Jagtap
समोसा हा पदार्थ संपूर्ण भारतामध्ये विख्यात आहे. असे खूप कमीच लोक असतील ज्यांनी समोसा खाल्ला नसेल
मात्र या समोसाचा उगम भारतामध्ये कसा झाला हे तुम्हाला माहिती आहे का?
असं म्हणतात की, आफगाण आक्रमकता महमूद गजनवी याने भारतामध्ये पहिल्यांदा समोसा आणला
सुरुवातीच्या काळात या समोस्यामध्ये बटाटा नव्हता त्याच्यामध्ये सुकामेवा किंवा फळ टाकली जायची
भारतातील बिहार आणि पश्चिम बंगाल प्रांतात सुरूवातीला समोसा प्रचलित झाला, असं म्हटलं जातं. त्या प्रांतांमध्ये याला शिंघाडा असं म्हटलं जातं.
अजूनही अफगाणिस्तान मध्ये समोसा बनवला जातो. मात्र त्यामध्ये मटण घातल जात.
मात्र भारतीय लोक जास्त करून शाकाहारी असल्यामुळे समोस्यामध्ये मटणा ऐवजी बटाटे आले. असे म्हटले जाते