सकाळ डिजिटल टीम
सफरचंद खाण्याचे फायदे आपल्या सर्वांना माहित आहेत. हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून अनेक आजारांपासून आपलं संरक्षण करतात.
पण तुम्हाला माहित आहे का की, काही लोकांनी सफरचंदाचे सेवन करू नये. कारण, काही लोकांमध्ये त्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात.
सफरचंदात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, आहारातील फायबर आणि खनिजे आढळतात. सफरचंदात क्वेर्सेटिन, कॅटेचिन आणि क्लोरोजेनिक ॲसिड सारखे अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत.
सफरचंदमध्ये आहारातील फायबर गुणधर्म असतात, जे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. सफरचंदमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते, त्यामुळे ते वजन कमी करण्यासही मदत करते.
सफरचंदामध्ये एक प्रकारचा प्रीबायोटिक फायबर असतो, जो पोटातील चांगल्या बॅक्टेरियांना पोषण देतो आणि आपल्या शरीराची पचनशक्ती मजबूत करतो.
पण, काही लोकांनी सफरचंद खाणे टाळावे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण, यामुळे काही लोकांमध्ये अॅलर्जी होऊ शकते, ही अॅलर्जी विशेषतः ओरल अॅलर्जी सिंड्रोम असलेल्या लोकांमध्ये आढळते.
जास्त सफरचंद खाल्ल्याने तोंड, घसा आणि त्वचेला खाज येणे किंवा सूज येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. शिवाय, सफरचंदाचे जास्त सेवन केल्याने पोट फुगणे, गॅस किंवा पोटात क्रॅम्प सारख्या समस्या उद्भवू शकतात.
इतकंच नाही तर सफरचंदाचा रस प्यायल्यास अँटीहिस्टामाइन्स आणि अँटीबायोटिक्ससारखी औषधे पचनामध्ये समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे तुम्ही जेव्हाही सफरचंद खात असाल तेव्हा यानंतर मुळा, आंबट फळे आणि लोणचे यासारख्या गोष्टी खाणे टाळावे.