सकाळ डिजिटल टीम
कुत्रे पाळण्यासाठी जसा महापालिकेचा परवाना घ्यावा लागतो त्याच पद्धतीने आता घरात मांजर पाळण्यासाठी पुणे शहरातील लोकांना पुणे महानगरपालिकेचा परवाना घ्यावा लागणार आहे.
आरोग्य विभागाच्या या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली.
महापालिकेच्या माहितीनुसार शहरात मांजर पाळण्याचे प्रमाणही वाढत असले तरी परवाना घेण्याबाबत नागरिकांची मानसिकता नाही.
कुत्र्यांप्रमाणे पाळीव मांजराची महापालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
मांजराची नोंदणी करण्यासाठी वार्षिक ५० रुपये इतके शुल्क निश्चीत केले आहे.
नोंदणीसाठी नागरिकांचा रहिवासी पुरावा,ॲटीरेबीज लसीकरण प्रमाणपत्र आणि मांजराचा फोटो या तीन कागदपत्रांची गरज आहे.
दरवर्षी नव्याने नोंदणी करावी लागेल. नूतनीकरण करताना ५० रुपये परवाना शुल्काशिवाय अतिरिक्त २५ रुपये शुल्क घेतले जाणार आहे.
पुणे महापालिकेने कुत्र्याच्या नोंदणीप्रमाणे मांजरांची नोंदणीही ऑनलाइन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.